अकोलेतील महिलेची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक
अकोले | Akole: तुम्हाला घरबसल्या महा ईसेवा केंद्र सुरु करून देतो असा विश्वास संपादन करून रुपाली प्रशांत गिते या महिलेची ८९ हजार रुपयांची फसवणूक करून पैसे परत मागितल्याने फोनवर पैसे देणार नाही तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी महिलेने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अकोले पोलिसांनी सदर आरोपी संदीप शरद बुळे रा. खराडी जि. पुणे यास जळगाव येथून अटक करण्यात आली आहे.
याबाबत अकोले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोलेतील धुमाळवाडी येथील रुपाली प्रशांत गीते या महिलेला संदीप शरद बुळे याने फोन करून तुम्हाला घरबसल्या महा ईसेवा केंद्र सुरु करून देतो. असे म्हणून विश्वास संपादन करून ८९ हजर रुपये फोन पे वरून ऑनलाईन घेतले व फिर्यादी महिलेस बँकेचे चेक दिले व ते बाउंस होऊन महिलेचे फसवणूक केली. महिलेने दिलेली रक्कम परत मागितली पैसे परत देणार नाही. तुला काय करायचे ते कर असे म्हणून फोनवर शिवीगाळ केली असल्याची फिर्याद महिलने १८ मे २०२१ रोजी दिली.
त्यानंतर अकोलेचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून तपासासाठी पाठविण्यात आले. पथकाने शिथापीने तपास करून २० जून रोजी जळगाव येथून आरोपीस ताब्यात घेत अकोलेस आणले. आरोपीकडून फसवणूक झालेली ८९ हजाराची रक्कम सदर महिलेस मिळवून दिली. अकोले पोलिसांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यात अभिंनदन होत आहे.
Web Title: Akole police arrested for online cheating person