Home अकोले अकोले: टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार

अकोले: टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार

अकोले: अकोले तालुक्यातील राजूर कोतूळ रस्त्यावरील पाडळणे गावाच्या बस थांब्याजवळ टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात पाडाळणे येथील शरद विठोबा आढळ हा तरुण ठार झाला आहे. तर त्याची पत्नी मुक्ता शरद आढळ गंभीर जखमी झाली.हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडला.

दरम्यान पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालाकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी साडे सातच्या सुमारास मयत शरद आढळ हा आपल्या पत्नी सोबत हळदीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवर चालले होते.यावेळी टेम्पो क्रमांक एम.एच. १७ए. जे. २९४० ने त्यास जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात शरद आढळ ठार झाला. तर त्याची पत्नी मुक्ता गंभीर जखमी झाली. अपघात होताच टेम्पो चालक फरार झाला. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Website Title: Akole One killed in a tempo and a bike accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here