Home अकोले अकोले नगरपंचायत चार मतदान केंद्रातील इतके टक्के मतदान, आज निकाल

अकोले नगरपंचायत चार मतदान केंद्रातील इतके टक्के मतदान, आज निकाल

Akole  Nagarpanchayat Election four Seat election

Akole  Nagarpanchayat Election | अकोले : अकोले नगरपंचायतसाठी 4 प्रभागांतील 4 मतदान केद्रांतील 3137 मतदारांपैकी 2526 मतदारांनी मतदान केले आहे. एकूण मतदान 80.52 टक्के झाले आहे. १७ प्रभागातील  भवितव्य मतपेटीत बंद आहे. आज दिनांक १९ जानेवारो रोजी मतमोजणी होणार असून निकाल समोर येणार आहे.

यावेळी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे व निवडणूक सहाय्यक अधिकारी व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय व पो.नि. मिथुन घुगे यांनी पोलीस बंदोबस्त कडकपणे ठेवून निवडणूक शांततेत पार पडली.

मंगळवार दि 18 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरूवात झाली. सुरूवातीला काही वॉर्डात कमी वेग होता. मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. अनेक प्रभागांत अटीतटीच्या लढती होत असल्याचे चित्र होते. अकोले नगरपंचायतच्या 4 प्रभागांतील एकूण 3137 मतदारांपैकी 2526 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याने एकूण मतदान 80.52 टक्के झाले आहे.

प्रभाग निहाय झालेले मतदान : 

प्रभाग 4- 817 पैकी 623 मतदान (76.25 टक्के)

प्रभाग 11- 802 पैकी 651 मतदान (81. 17 टक्के)

प्रभाग 13- 635 पैकी 541 मतदान (85.20टक्के)

प्रभाग 14 – 883पैकी 711मतदान (80.52टक्के )

Web Title: Akole  Nagarpanchayat Election four Seat election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here