अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी व उपनगराध्यक्षपदी यांची झाली निवड
अकोले | Akole Nagar Panchayat Mayor and Deputy Mayor: नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी भाजपचे सोनाली नाईकवाडी (Sonali Naikwadi) व उपनगराध्यक्षपदी भाजपचे बाळासाहेब वडजे (Balasaheb Vadaje)यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अकोले नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक नगरपंचायत सभागृहात पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरूळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाजपचे 12 आणि विरोधी राष्ट्रवादी, शिवसेना ( आघाडीचे 4 असे 16 नगरसेवक सभेला उपस्थित होते. भाजपच्या सोनाली नाईकवाडी यांना 12 मते मिळाली. तर नवनाथ शेटे यांना 4 मते पडली. काँग्रेसचे एकमेव नगरसेवक सभागृहाकडे फिरकलेच नाहीत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मंगरुळे यांनी नगराध्यक्षपदी सोनाली नाईकवाडी विजयी झाल्याचे घोषित केले.
वाचा: Ahmednagar News
उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे बाळासाहेब वडजे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आले आहे.
Web Title: Akole Nagar Panchayat Mayor and Deputy Mayor