अकोले: बिबट्याचा तरुणावर हल्ला पिंजरा लावण्याची मागणी
अकोले: बिबट्याचा तरुणावर हल्ला पिंजरा लावण्याची मागणी
देवठाण: अकोले तालुक्यातील देवठाण येथे बिबट्याचा भरदिवसा मुक्त संचार आढळून येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जंगलातून उसाच्या पिकांमध्ये बिबटे लपून बसतात. परंतु आता उस तोड सुरु असल्याने बिबटे बाहेर पडत आहे. देवठाण भागातील गौतम गायकवाड नावाच्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला आहे. यापूर्वीही अनेकांवर हल्ले झाले आहेत. तेव्हापासून वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करीत आहे.
देवठाण शिवारात पाच ते सहा बिबटे असण्याची शक्यता आहे. दररोज कोणाला अन कोणाला तरी बिबटे आढळून येतात. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांना या भागात बिबटे पकडण्यासाठी त्वरित पिंजरे वनविभागाने लावावेत असी मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली आहे. येत्या आठ दिवसांत पिंजरे लावून बिबट्यांना अंड करावे अन्यथा संगमनेर येथील वनविभाग कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याची शिवसेनेचे देवठाण शाखाप्रमुख राम सहाने यांनी दिली. या निवेदनाच्या प्रती वनमंत्री सुधीर मनगंटीवार, पालक मंत्री राम शिंदे, सदाशिव लोखंडे, आ. वैभवराव पिचड जीहाधिकारी आदींना पाठविल्या आहेत. या निवेदनावर ग्रामस्थांच्या सह्या केलेल्या आहेत.
Website Title: Akole leopard attack on youth
Latest: Sangamner News, Akole News, And Entertainment News
अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.