Home अकोले अकोले: केळुंगण येथील खळबळजनक घटना उघडकीस सासूने आणि पतीनेच विष पाजले

अकोले: केळुंगण येथील खळबळजनक घटना उघडकीस सासूने आणि पतीनेच विष पाजले

अकोले: अकोले तालुक्यातील केळुंगण गावातील लक्ष्मी देशमुख या विवाहितेला पती व सासूने विषारी औषध पाजले होते मात्र दैवबलत्तर म्हणून लक्ष्मी देशमुख हि शुद्धीवर आली असून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. लक्ष्मी देशमुखवर अकोले तालुक्यातील भांडकोळी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत. लक्ष्मीला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. मात्र तिने उपचाराला प्रतिसाद दिल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच जि. प. सदस्य यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन लक्ष्मी देशमुखच्या प्रकृतीची विचारपूस केली.

लक्ष्मीचे दोन वर्षापूर्वी अमोल देशमुख या तरुणाशी विवाह झाला होता. मात्र काही दिवसांतच लक्ष्मीला सासरच्या मंडळीकडून मानसिक त्रास होऊ लागला. अखेर कायमच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून लक्ष्मी माहेरी निघून गेली. मात्र माहेरी निघून जाताच आपल्या पतीने दुसरे लग्न केले असल्याचे लक्ष्मीला समजले. लक्ष्मीला तिचा भाऊ व मामा सोबत घेऊन गेले असता तिला तिच्या पतीने व सासूने बळजबरीने विषारी औषध पाजले असा जवाब लक्ष्मीने शुद्धीवर आल्यावर दिला. पोलीस यंत्रणा तिचा जवाब घेणार आहे. तिच्या जवबावरून तिच्या पतीवर व सासूवर गुन्हा दाखल होऊ शकतो. लक्ष्मीला न्याय दिला नाही तर राजूर पोलीस ठाण्यासमोर सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा बाळासाहेब धोंगडे यांनी दिला आहे.   

Website Title: Akole kelungan Crime news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here