अकोले: कळस येथे सार्वजनिक रस्त्याच्या वादातून दोन गटांत लाथाबुक्क्यांनी मारहाण
कळस: अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे रस्त्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. हि घटना २० जुन रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सतीश काशिनाथ वाकचौरे वय 38 वर्ष धंदा शेती राहणार कळस बुद्रुक यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की, २० जुन रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कळस बुद्रुक येथील पुरुषोत्तम भाऊसाहेब वाकचौरे व सतीश काशिनाथ वाकचौरे हे एकमेकांचे भावबंद असून त्यांचे जाणे येण्याचे रस्त्यावरून नेहमी वाद होतात म्हणून सदर रस्ता प्रकरण हे माननीय तहसीलदार अकोले यांचेकडे वाद चालू आहे आज रोजी त्यांची तहसीलदार सौ अकोले यांचेकडे सदर रस्ता केसची तारीख होती त्यानंतर फिर्यादी त्याचे घरी गेल्यावर यातील आरोपी पुरुषोत्तम भाऊसाहेब वाकचौरे व आशा भाऊसाहेब वाकचौरे यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्रित जमा करून फिर्यादीचे घरासमोर येऊन म्हणाले की तुम्ही तहसीलदार सो यांचे पत्र आणावे व तूम्हाला रस्ता घ्या असे म्हणून आरोपी पुरुषोत्तम भाऊसाहेब वाकचौरे याने त्याचे हातातील कुर्हाडीचे घाव कपाळावर मारून जखमी केले त्यावेळी फिर्यादी त्याचे घरात गेला असता आरोपी नंबर एक ते आठ हे घरात घुसून आरोपी नंबर दोन याने फिर्यादीचा भाऊ यास बर्गडी वरच मारला व आरोपी पुरुषोत्तम भाऊसाहेब वाकचौरे, रामभाऊ एकनाथ वाकचौरे,, वनिता रामभाऊ वाकचौरे वृषाली पुरुषोत्तम वाकचौरे, विमल एकनाथ वाकचौरे , एकनाथ बबन वाकचौर, .भाऊसाहेब बबन वाकचौरे , आशा भाऊसाहेब वाकचौरे सर्व राहणार कळस बुद्रुक यांनी पत्नी भाऊ भावजय अशा सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली सतीश काशिनाथ वाकचौरे यांच्या घराची खिडकी ची काच फोडून नुकसान केले तसेच माननीय जिल्हाधिकारी सो अहमदनगर यांनी अहमदनगर जिल्ह्यात लागू केलेल्या 37 (1) तीन चे उल्लंघन 135 प्रमाणे केले आहे वगैरे मजकूर चेक फिर्यादीवरून गु.रजिस्टर नंबर- I 235/19 भा द वि 324,323,504,506,452,143,147,148,149, 427 मु.पोलीस अन् कलम ३७(१)(३)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
या मारहाणीत अनिता सतीश वाकचौरे, बाळासाहेब काशिनाथ वाकचौरे, सतीश काशिनाथ वाकचौरे हे जबर जखमी झाले आहेत.
अकोले तालुक्याचे मा.पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.बी. भोसले करीत आहे.
Website Title: Akole Kalas Lathabukkki assaulted in two groups