Home अकोले अकोले हनीट्रॅप प्रकरण: शरीरसंबंधाचा अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देत दोन लाखाची...

अकोले हनीट्रॅप प्रकरण: शरीरसंबंधाचा अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देत दोन लाखाची खंडणी

Akole Honey trap Case

अकोले | Honey Trap:  तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून शरीरसंबंधाचा अश्लील व्हिडिओ बनविला. आणि बदनामीची धमकी देत त्याचेकडून दोन लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या हनीट्रॅप मध्ये अडकलेल्या प्रतिष्ठिताने धाडसाने पुढे येत अकोले पोलिसांत तक्रार दिल्याने या महिलेचे बिंग फुटलें आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अकोले पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार गुन्ह्यातील आरोपी महिला व तिचे सहकारी यांनी दि. 11/06/2021 ते दि. 13/07/2021 रोजी 15.00 वाजता आरोपी महिला यांनी कटकारस्थान व सगनमत करुन या प्रतिष्टित व्यक्तीला शरीरसंबधाचे अमिष दाखवून त्यांचेतील महिलेसोबत शरीरसंबध ठेवणेस भाग पाडले त्याचा अश्लील व्हिडीओ बनवुन तो व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागितली या व्यक्तीने आरोपी यांना पैसे न दिल्याने आरोपीनी या व्यक्तीला मारहाण करुन व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देवुन या व्यक्तीच्या ए.टी.एम मशीन मधुन 30,000/-रु बळजबरीने काढायला लावुन पैसे काढल्या नंतर ते बळजबरीने तक्रारदार यांचे कडुन घेवुन अजुन 1,70,000/- रुपयांची मागणी केली

अशा आशयाची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मिथुन घुगे यांनी लागलीच सदर घटनेबाबत वरिष्टांना कळविले तक्रारदार सांगत असलेल्या घटनाक्रमानुसार दोन पंचाना घेवुन घटनेची हकिगत समजावून सांगुन तक्रारदार यांचे कडे रुपये 500/- रु. दराच्या 20 नोटा असे 10,000/- रु. देवुनत्यांना सुगाव फाटा येथे जावुन थांबण्यास सांगितले व तेथे पोलीसांनी पंचासमक्ष सापळा लावुन एक महिला व एकपुरुष आरोपी यांना तक्रारदार यांचेकडुन 10,000/- रु. खंडणी घेताना रंगेहाथ पकडले असुन गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन जप्त करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी अकोले पोलीस स्टेशनला । गुरनं 253/2021, भा,द,वि कलम 120(ब) ,394, 384, 385, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करण्यात आली असुन आज रोजी मा. न्यायालयात हजर केले असतात्यांना दिनांक 19.07.2021 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली सदर आरोपी यांना विश्वासात घेवुनविचारपुस करण्यात आली असता त्यातील महिला आरोपी हीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीचा शोध घेणे चालु असुन सदर आरोपीने आणखी किती व्यक्तींना आशा पध्दतीने लुबाडले याबाबत तपास सुरु आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील व अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे,. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मिथुन घुगे तसेच अकोले पोलीस स्टेशन स्टाफ यांनी सदरची कारवाई केली नागरिंकानी कोणतीही भिती न बाळगता अश्या प्रकारे शरीर संबधाचे आमिष दाखवुन अश्लिल व्हिडीओ बनवुन त्याची धमकी देवुन लुट झाल्यास अथवा पैश्याची मागणी केली असल्यास तात्काळ पोलीस ठान्यातगुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील यांनी केले आहे.

Web Title: Akole Honey trap Case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here