अकोले तालुक्यात प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचा बुडून मृत्यू
अकोले | Akole: राहुरी येथील स्थायिक व सध्या अकोले पोलीस स्टेशनला बंदोबस्त कामी असलेला शहरातील प्रवरा नदीपात्रातील केटीवेअर जवळ पोहण्यासाठी गेलेल्या होमगार्डचचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. संदेश राजेंद्र विटनोर असे या मयत होमगार्डचे नाव आहे.
अकोले तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना मदत कामी काही होमगार्डची नियुक्ती अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी केली होती. त्यांची राहण्याची सोय अगस्ती मंदिर या ठिकाणी केलेली होती. तो मुळचा राहुरी येथील रहिवासी आहे. २४ सप्टेंबर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रवरा नदीपात्रातील नगरपंचायत केटीवेअर जवळ मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेला होता. तेव्हा पोहोताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.
याबाबत होमगार्ड मित्रांनी अकोले पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना सांगितले. त्यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक दीपल ढोमणे व कॉन्स्टेबल यांना घटनास्थळी पाठविले. दिवसभर शोध घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ५ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविचेदन करण्यात आले.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole home guard who went for a swim in the Pravara river basin drowned