अकोलेत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट
Akole rain News: वादळी वारे आणि पावसाने चांगलीच धांदळ.
अकोले: एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज सायंकाळच्या सुमारास अकोले शहरात पावसाने हजेरी लावली होती. सहा वाजेच्या सुमारास पावसाने अकोलेत जोरदार हजेरी लावली. त्यानंतर साडे सात वाजेच्या सुमारास वादळी वारे आणि विजांचा गडगडाट व पावसाने चांगलीच धांदळ उडाली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सुर्यदर्शनही तुरळक झाले. याशिवाय आज पहाटेपासूनच पावसाचे थेंब पडू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. तर हवामान विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता तो आज खरा ठरला. तसेच जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून हिवाळा व पावसाळ्याचे एकत्र दर्शन झाले. मात्र, या अवकाळी पावसामुळे
दरम्यान, अजून दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हिवाळी मोसमी व चक्रीय वारे सक्रीय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. अहमदनगर जिल्हात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Web Title: Akole Heavy occurrence of unseasonal rain followed by thunder and lightning
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App