अकोले: लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची गाव विहिरीत उडी मारून आत्महत्या.
अकोले: लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची गाव विहिरीत उडी मारून आत्महत्या
ललित मुतडक राजूर प्रतिनिधी:- मान्हेरेत लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीची गाव विहिरीत उडी मारून आत्महत्या.आरोपीस तीन दिवसांची पोलीस कस्टडी.अकोले तालुक्यातील मान्हेरे गावातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले व त्यानंतर लग्नास ऐन वेळी नकार दिल्याने सदर अल्पवयीन मुलीने मान्हेरे शिवारातील गाव विहिरीत गुरुवारी दि.२८ मार्च रोजी उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.याप्रकरणी आरोपीस शुक्रवारी कोर्टापुढे हजर केले असता आरोपीस तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असेकी,अकोले तालुक्यातील मान्हेरे येथील झालेल्या आत्महत्या प्रकरणी राजूर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की,यातील पीडित मयत हिचे व दिनेश घोरपडे,यांच्यात प्रेमसंबंध होते,त्याने पीडित मयत अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवत ती चार महिन्यांची गर्भवती होती,त्यानंतर तिने त्यास लग्नाची गळ घातली मात्र त्याने ऐन वेळेला त्या अल्पवयीन मुलीस लग्नास नकार दिल्याने मयत अल्पवयीन मुलीने गुरुवारी दि.२८ मार्च रोजी,दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास मान्हेरे गावातील गाव विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती.तिच्या चुलत्यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी दि.२८ मार्च रोजी राजूर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.त्याचा तपास पो.हे.कॉ.किशोर तळपे यांनी केला.
सदर अकस्मात मृत्यूमधील पीएम मध्ये सदर मयत ही चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच सदर मयताच्या भावाने राजूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी दिनेश दारकू घोरपडे (वय-२०वर्ष रा.मान्हेरे) याच्या विरोधात तक्रार दिल्याने भा.द.वी.कलम ३७६ (२) (ळ),३०६ तसेच पोक्सो कलम ४,५ (ग) (ळ ळ) ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.संगमनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी व त्यांचे सहकारी यांनी मान्हेरे गावास भेट दिली व कायदा सुव्यवस्था यासंदर्भात राजुर पोलिसांनी सूचना केल्या.आरोपी दिनेश दारकू घोरपडे (वय- २०वर्ष) यास पोलिसांनी अटक करून शुक्रवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक पी.वाय.कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.किशोर तळपे,प्रवीण थोरात व सहकारी करत आहेत.
Website Title: Akole girl committed suicide after refusing marriage
Latest: Sangamner News, Akole News, And Entertainment News
अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.