Home अकोले दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी अकोले येथे जेरबंद, दरोड्याचे साहित्य जप्त

दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी अकोले येथे जेरबंद, दरोड्याचे साहित्य जप्त

दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी अकोले येथे जेरबंद, दरोड्याचे साहित्य जप्त

अकोले: रात्रीची गस्त घालत असताना अकोले पोलिसांना संशय आल्याने दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. अकोले पोलीस स्टेशन पोलीस हद्दीत रात्रीच्या वेळी मोटार सायकल चोरी तसेच घरफोडी होत असल्याने रात्र गस्त कामी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस ठाणे हद्दीत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस उपनिरीक्षक सफी शेख , जेनुद्दिन, पोलीस हेड कॉन्स्टेबल निमसे,पोलीस नाईक मोरे,उगले, खरात असे अकोले शहरात रात्री गस्त करत होते.

You May Also Like: Shahid Kapoor wife age | Mira Rajput

कोल्हार घोटी रोडवर एका मोटार सायकलवर पाच इसम संशयित रित्या बसून जाताना दिसल्याने त्यांना थांबण्यास सांगितले. ते पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांचा पाठलाग करून त्यातील चार इसमांना पकडून त्यांची झडती घेतली त्यांच्या ताब्यात एक लोखंडी कटावणी, लोखंडी हातोडा, पक्कड , मोटार सायकल च्या वेगवेगळ्या चाव्या, दोन चाकू असे हत्यारे, बजाज गाडी असा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळून आला.

आदित्य एकनाथ सोनावणे (रा. समशेरपूर ता. अकोले). सोमनाथ शिवाजी भूताम्बरे , अनिल काशिनाथ आगिवले रा.समशेरपूर अल्पवयीन मुलगा व अनोळखी इसम असे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. वरील इसमांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय दंड संहिता ३९९ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे दाखल केला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही . एन.काळे करीत आहेत.

websites

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports,Entertainment NewsSangamner Taluka NewsAkole Taluka NewsC News Sangamner and local news from all cities of Maharashtra.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here