Home अकोले शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी खतांची वाढलेली दरवाढ तात्काळ रद्द करा: मनसेचा इशारा

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी खतांची वाढलेली दरवाढ तात्काळ रद्द करा: मनसेचा इशारा

Akole cancel the increased price of fertilizers 

अकोले | Akole: केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यास मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे. अगोदरच वाढलेली महागाई, कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोलमडून पडलेली असल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे खतांची वाढलेली दरवाढ तात्काळ रद्द करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला.

यासंदर्भात पक्षाध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या सुचनेनुसार,   १७ मे रोजी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन दिले.

 निवेदनात नमूद केले आहे की, खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात खतांसाठी वापरल्या जाणार्‍या कच्या मालाचे भाव वाढल्याचे कारण सांगून इफ्को कोरोमंडल, आरसीएफ सहित सर्वच कंपन्यांनी खतांच्या किंमतीत जबर वाढ केली आहे. या दरवाढीमुळे याआधी १२०० रु ला मिळणारी डीएपी खताची गोणी आता शेतकर्‍यांना १९०० रुपयांना घ्यावी लागणार आहे तर १०:२६:२६ खताचा दर ११७५ रु. वरून १७७५ झाला आहे. तसेच २०:२०:०:१३ चा दर ९७५ रु. वरून १३५० रु. व  १२:३२:१६ चा दर ११८५ वरून १८०० रु. झाला आहे. यामुळे आता एवढा महागडा खत कसा विकत घ्यायचा व पेरणी कशी करायची असा प्रश्न देशभरातील शेतकर्‍यांना पडला आहे.

केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यास मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकर्‍यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे. अगोदरच वाढलेली महागाई, कोरोनाचे संकट व लॉकडाऊनमुळे शेतीमाल विक्री व्यवस्था कोलमडून पडलेली असल्याने शेतकरी परेशान आहे. अशा परीस्थीतीत हा खतांच्या दरवाढीचा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असाच आहे खरेतर केंद्र सरकारने यावर्षी खतांवरील अनुदानात वाढ करून खत दर नियंत्रणात ठेवणे गरजेचे होते परंतु केंद्र सरकारने मागच्या वर्षीचेच अनुदान कायम ठेवून खतांच्या दरवाढीला एक प्रकारे हातभार लावन्याचेच काम केले आहे. एकाबाजूला खतांचे दर मोठया प्रमाणावर वाढवून केंद्र सरकार शेतकर्‍यांची लूट करत आहे तर दुसरीकडे  पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९ हजार कोटीचा हफ्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करून केंद्र सरकार पाट थोपटून घेत आहे. परंतु सद्य परिस्थितीत शेतकर्‍यांना पीएम किसान निधीचे पैसे पेरणीच्या कामाला तेवढे उपयोगी पडणार नाहीत. केंद्र सरकारला शेतकर्‍यांना खरोखर मदत करायचीच असेल तर केंद्र सरकारने तात्काळ खतांची दरवाढ रद्द करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर आंदोलन करेल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे .

Web Title: Akole cancel the increased price of fertilizers 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here