Home अकोले अकोले: स्टेट बँकेच्या अकोले शाखेला किसान सभा टाळे ठोकणार

अकोले: स्टेट बँकेच्या अकोले शाखेला किसान सभा टाळे ठोकणार

अकोले: स्टेट बँकेच्या अकोले शाखेला किसान सभा टाळे ठोकणार

अकोले: भारतीय स्टेट बँकेच्या अकोले शाखेत ग्राहकांना मिळणा-या संतापजनक वागणूकी विरोधात असंतोष वाढत असून बँकेच्या व्यवस्थापनाचे वर्तन न सुधारल्यास बँकेच्या अकोले शाखेला टाळे ठोकण्यात येतील असा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे. स्टेट बँकेच्या अकोले शाखेत ग्राहकांना अत्यंत मनस्तापकारक वागणूक मिळत आहे. साध्या साध्या कामांसाठी ग्राहकांची पिळवणूक केली जात आहे. चुकीचे व उद्धट मार्गदर्शन, उद्धट सेवा व संतापजनक वागणुकीमुळे ग्राहक बँकेतील खाते बंद करण्याच्या मनस्थितीत आहेत. शेतक-यांनाही बँक प्रशासनाकडून नेहमीच हेटाळणी व उपेक्षेची वागणूक देण्यात येत  आहे.

बँकेत वृद्ध, अपंग, विधवा, परित्यक्तांचे, निराधार योजनेचे सरकारी मानधन वर्ग होत असते. विडी कामगारांचेही पेंशन वर्ग होते. अनेकदा अत्यंत चुकीच्या कारणांसाठी ते खात्यात वर्ग करण्यापासून रोखण्याचे प्रकार बँकेत वारंवार घडत आहेत. गरीब निराधारांना यामुळे असह्यपणे बँकेत वारंवार चकरा माराव्या लागतात. शासकीय योजनांच्या कर्ज वितरणातही भ्रष्टाचार व पक्षपाताचे आरोप झाले आहेत. नियमित कर्जदारांनाही अत्यंत चुकीची वागणूक दिली जात आहे. बँकेच्या या वर्तनात बदल न झाल्यास बँकेच्या अकोले शाखेला टाळे ठोकण्याचे आंदोलन करावे लागेल. आंदोलनाची पूर्वसूचना देणारे पत्र संबंधिताना देण्यात आले आहे. आंदोलन मात्र कोणतीही पूर्व सूचना न देता करण्यात येईल असा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे. 

Website Title: Akole branch of State Bank of India will hold the Kisan Sabha


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here