अकोलेतील नेता हरपला! कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव भांगरे यांचे निधन
Akole Ashokarao Bhangare Passes away: अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव यशवंतराव भांगरे यांचे आज गुरुवारी (दि 12 ) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन.
अकोले: अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकराव यशवंतराव भांगरे यांचे आज गुरुवारी (दि 12 ) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले
आज गुरुवारी रात्री 7.30 वाजता त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला यावेळी त्यांना तातडीने घोटी येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला
त्यांच्या निधनाची वार्ता तालुक्यात समजतात सर्वत्र दुःखाची छाया पसरली त्यांच्या अचानक जाण्याने अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे
माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पारंपरिक विरोधक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते सलग पाच विधानसभा निवडणुका त्यांनी मधुकर पिचड यांच्या विरोधात लढल्या त्यात त्यांना प्रत्येक वेळी पराभवाला सामोरे जावे लागले असे असताना देखील त्यांनी कधीही हार न मानता त्यांनी खंबीरपणाने पिचड विरोधक म्हणून राजकारणात भूमिका साकारली पंचायत समिती सदस्य सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे सभापती अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
Web Title: Akole Ashokarao Bhangare Passes away
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App