अकोलेतील घटना: ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा जागीच मृत्यू
Ahmednagar | Akole Accident News: ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर फुटून ट्रॅक्टरखाली दबून झालेल्या अपघातात एका ३० वर्षीय ट्रॅक्टरचालकाचा दुर्दैवी मृत्यू (Died).
अकोले: अगस्ति सहकारी साखर कारखान्यावर ऊस खाली करून धामणगाव आवारीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा टायर फुटून ट्रॅक्टरखाली दबून झालेल्या अपघातात एका ३० वर्षीय ट्रॅक्टरचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कारखान्याच्या पाठीमागून धामणगाव आवारीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
या घटनेत ट्रॅक्टरचालक दिलीप गंगाधर आवारी याचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अगस्ति कारखान्यावर ऊस खाली करून धामणगाव आवारी येथे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा टायर फुटला व ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली दहा फूट कोसळला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबल्याने दिलीप आवारी या युवकाचा जागेवर मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर जेसीबी बोलावून ट्रॅक्टर बाजूला करून दिलीप आवारीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अकोले पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून या दुर्दैवी घटनेमुळे धामणगाव आवारी गावावर शोककळा पसरली आहे.
Web Title: Akole Accident driver died on the spot after being crushed under the tractor
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App