Home अकोले अभिनव शिक्षण संस्थेच्या अभिनव प्री  स्कूल-ए शाखेचे नवलेवाडीत उद्घाटन   

अभिनव शिक्षण संस्थेच्या अभिनव प्री  स्कूल-ए शाखेचे नवलेवाडीत उद्घाटन   

अभिनव शिक्षण संस्थेच्या अभिनव प्री  स्कूल-ए शाखेचे नवलेवाडीत उद्घाटन   

अकोले :पालकांच्या सोयीनुसार अभिनव शिक्षण संस्थेने नर्सरी ,ज्युनिअर के.जी. व सिनिअर के जी या वर्गांसाठी नवीन नवलेवाडी , अमृतनगर या ठिकाणी सर्व सोयी सुविधायुक्त अभिनव प्री  स्कूल-ए शाखा सुरु केली.
सदर शाखेचे उद्घाटन अभिनव शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी , सह सेक्रेटरी रामकृष्ण नवले यांच्या हस्ते तर संस्थेच्या सी.बी.एस.ई विभागाच्या डायरेक्टर प्राचार्या जयश्री देशमुख, वसुंधरा अकॅडेमिचे प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी, प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव ,  राधिका नवले, प्री  स्कूल-ए शाखेच्या इन्स्ट्रक्टर शितल तळेकर,प्री  स्कूल-ए शाखेच्या इन्स्ट्रक्टर माया आहेर , प्रा. पांडुरंग गुंजाळ, अभिनव कला अकॅडेमी चे प्राचार्य इंद्रभान कोल्हाळ, प्रशासकीय अधिकारी दिलीपकुमार मंडलिक,संगीताताई सापिके  तसेच सर्व शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी  संस्थेचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी व सह सेक्रेटरी रामकृष्ण नवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पालकांच्या आग्रहानुसार व सोयीनुसार  सदर  प्री  स्कूल-ए नवलेवाडीत सुरु केले असल्याचे नमूद केले. बदलत्या शैक्षणिक वातावरणानुसार होत असलेले शैक्षणिक बदल विचारात घेवून के जी विभागातील मुलांच्या बालवयावर शैक्षणिक संस्कार होण्याकरिता व या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण देण्याकरिता अभिनव ने हा स्वतंत्र विभाग सुरु केला असल्याची माहिती अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले  यांनी पत्रकारांना दिली. आभार संगीता वर्पे यांनी मानले.

Website Title: Akole Abhinav Shikshan Sanstha Pre School Innovation


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.


आपल्या बिझनेसची जाहिरात करा ऑनलाईन. आपल्या बिझनेस, संस्था, दुकान, न्यूज ची वेबसाईट बनवा अत्यल्प दरात. आजच संपर्क करा. मोबा. 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here