Home अहमदनगर Accident | अहमदनगर: कर्डिले यांच्या गाडीचा अपघात

Accident | अहमदनगर: कर्डिले यांच्या गाडीचा अपघात

Ahmednagar Accident: पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्कोडा गाडीने कर्डिले यांच्या वाहनाला मागून जोराची धडक.

Akashy Kardile's car accident

अहमदनगर : माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाहनाचा क्र. एमएच १६ बीवाय ९९९ चा रविवारी भीषण अपघात (Accident) झाला. सुदैवाने या अपघातात अक्षय कर्डिले यांना कोणतीही इजा झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, युवा नेते अक्षय कर्डिले हे त्यांच्या वाहनाने नगर- औरंगाबाद महामार्गाने जात होते. कर्डिले यांचे वाहन याच रोडवरील चेतना लॉन्स समोर आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्कोडा गाडीने कर्डिले यांच्या वाहनाला मागून जोराची धडक दिली. या अपघात दोन्हीही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. जिवितहानी झाली नाही. दरम्यान अक्षय कर्डिले यांनी मी सुखरूप असल्याचे सांगितले.

Web Title: Akashy Kardile’s car accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here