नगरची झाली दिल्ली, नगरवर धुक्याची चादर, ढगाळ हवामान
Ahmednagar weather update: संपूर्ण जिल्हा गुरुवारी पहाटे धुक्यात बुडाला, ढगाळ हवामान: पारा दहा अंशावर.
अहमदनगर: शहरासह संपूर्ण जिल्हा गुरुवारी पहाटे धुक्यात बुडाला.वारा वाहत आहे. सूर्यदर्शन अधूनमधून होत आहे. गुरुवारी रात्रीचे तापमान दहा अंशाच्या खाली उतरल्याने थंडीत वाढ झाली. शुक्रवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. सूर्यदर्शन अधूनमधून होत होते. ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे थंडीचा कडाका नसला तरी गार वारे वाहत होते.
डिसेंबर महिन्यात गायब झालेली थंडी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परतली आहे. अंशत: ढगाळ हवामान आणि पहाटेचे धुके असूनही थंडीचा कडाका वाढला होता. हवामान विभागाच्या नोंदीनुसार पारा १० अंशापर्यंत खाली उतरला आहे. नगरमध्ये जानेवारी २०१२ मध्ये किमान तापमान ५.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. इतरवेळी जानेवारीचे सरासरी किमान तापमान ११ अंश सेल्सिअस असते. सध्या दिवसभर हवेत गारवा आहे.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
गुरुवारी रात्री ११ वाजल्यापासून विरळ धुके होते. पहाटे ते दाट झाले. संपूर्ण जिल्ह्यावरच धुक्याची चादर लपेटली होती. धुक्यात काही दिसत नसल्याने सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्याही घटली होती. धुक्याचा प्रभाव सकाळी दहा वाजेपर्यंत होता. त्यामुळे लोकांचे दैनंदिन व्यवहारही उशिराच सुरू झाले. सूर्यदर्शन अधूनमधून होत होते. धुके कमी झाल्यानंतर सूर्यदर्शन झाले. त्यानंतर हवामानातील गारवा कमी झाला. शुक्रवारी सायंकाळी ढगाळ हवामान कायम असल्याने थंडी नव्हती.
Web Title: Ahmednagar weather update blanket of fog over the city, cloudy weather
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App