Home अहमदनगर सावधान! अहमदनगर जिल्ह्यात या तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा: Weather Alert

सावधान! अहमदनगर जिल्ह्यात या तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा: Weather Alert

Ahmednagar Weather Alert:  अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा: हवामान विभाग.

Ahmednagar Weather Alert Today

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक, अहमदनगर, पुण्यासह राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धरणातील विसर्गही वाढवला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून ३६,७३१ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ४,५१७ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून २,२४० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून ८१४ क्युसेस, निळवंडे धरण १३०० क्यूसेस व ओझर बंधारा ९८३३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत ३८४.१ मि.मी. (८५.७ %) पर्जन्यमान झालेले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दुर रहावे व सुरक्ष‍ितस्थळी स्थलांतर करावे.

वस्तुस्थ‍िती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ सुरक्ष‍ित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले आहे.

Web Title: Ahmednagar Weather Alert Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here