Home अहमदनगर Weather alert: अहमदनगरमध्ये या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद

Weather alert: अहमदनगरमध्ये या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद

Ahmednagar Weather alert high temperature

Ahmednagar Weather alert | अहमदनगर: यावर्षी मार्च महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेच्या झळा बसू लागल्या आहेत. मुंबईसह लगतच्या काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना अहमदनगरमध्येही शुक्रवारी या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली.

कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मार्च महिन्यातच पारा चाळीशी ओलांडल्याचे प्रकार गेल्या २२ वर्षांत यापूर्वी दोनदा घडलेले आहेत.

२००० मध्ये ३० मार्चला अहमदनगरमध्ये पारा ४३.२ अंशावर गेला होता. तर त्यानंतर २०१९ मध्ये ४२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले होते.

यावर्षी पुन्हा एकदा मार्चमध्ये पारा चढल्याने नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. उष्णतेचा कहर झाल्याने दुपारच्या सुमारास रस्ते पडतात. बाजारपेठेतील गर्दीही कमी झालेली दिसून येत आहे.

Web Title: Ahmednagar Weather alert high temperature

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here