Home अहिल्यानगर महावितरणच्या दोन वीज कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटकेत

महावितरणच्या दोन वीज कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटकेत

Ahmednagar Two MSEDCL employees arrested for taking bribe

Ahmednagar news live | Bribe Case अहमदनगर: हॉटेलसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचे बिल कमी करण्याच्या मोबादल्यात ६० हजारांची लाच घेताना महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब पांडुरंग टिमकरे वय ४३, शिरीष रावसाहेब भिसे वय ४५ असे अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघही कर्मचारी महावितरणच्या बायजाबाई जेऊर येथील उपकेंद्रात कार्यरत आहे. त्यांनी पांढरिची पूल येथील हॉटेलला येणारे वीज बिल वरिष्ठांना सांगून कमी करून देतो परंतु त्याबदल्यात ७० हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली होती. तक्रारदार व आरोपी यांच्यात तडजोडी अंती ६० हजार देण्याचे ठरले. ही रक्कम स्वीकारताना मदतनीस भिसे याने लाचलुचपत विभागाच्या पथकाने एका भेळ सेंटरमध्ये सापळा रचून रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.   

Web Title: Ahmednagar Two MSEDCL employees arrested for taking bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here