Home अहमदनगर अहमदनगर दुर्दैवी घटना! शेततळ्यात पडून दोन चिमुकल्या भावांचा मृत्यु, रंगाचा बेरंग

अहमदनगर दुर्दैवी घटना! शेततळ्यात पडून दोन चिमुकल्या भावांचा मृत्यु, रंगाचा बेरंग

Ahmednagar News: श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यकनाथ येथील खामकरवाडी येथे शेततळ्यात पडून दोन लहानग्या सख्या भावांचा मृत्यु (Death) झाल्याची घटना.

Ahmednagar Two little brothers Death after falling in the farm

श्रीगोंदा: रंगपंचमीच्या दिवशी रंगाचा बेरंग झाल्याची दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातून समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यकनाथ येथील खामकरवाडी येथे शेततळ्यात पडून दोन लहानग्या सख्या भावांचा मृत्यु झाल्याची घटना आज (दि.12) दुपारी घडली.

आर्यन (8) व अनिकेत बंडोपंत साळुंके (9, रा. खामकरवाडी ता. श्रीगोंदा) असे मयत झालेल्या भावांची नावे आहेत. मिळालेली माहिती अशी की,  हे दोन सख्ये भाऊ रंगपंचमी खेळत असताना पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर घराजवळील शेततळ्यात पडुन मृत्यु पावले. या घडनेनंतर खामकरवाडी परीसरासह लोणी व्यकनाथ गावावर शोककळा पसरली.

या चिमकुल्यांच्या आई वडिलांसह जवळच्या नातलगांनी केलेल्या आक्रोशाने सर्वजन हेलावले. बंडोपंत साळुंके हे अल्पभुधारक शेतकरी असल्याने ते आपल्या कुटुबांच्या उपजिवीकेसाठी घरची शेती कसता कसता शेतमजुर म्हणुन कामक करत होते. काही दिवसापुर्वी त्यांच्या चुलत भावाने घरानजवळ छोटे शेततळे केले होते.

शेतीसह शेळ्यांना पाणी उपलब्ध होईल असा मानस होता. परंतु आज रविवार त्यांत रंगपंचमी असल्याने लहान मुले खेळत खेळत गेली व त्या शेततळ्याला जाळीचे कुंपण नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Ahmednagar Two little brothers Death after falling in the farm

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here