Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लांबविले

अहमदनगर ब्रेकिंग: गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने लांबविले

Ahmednagar News:  शेतवस्तीवर राहणाऱ्या पती-पत्नीस चोरट्यांनी गळ्याला चाकू व गुप्ती लावत दांड्याने मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना.

Ahmednagar Theft knife was attached to the neck and gold ornaments were removed

शेवगाव: तालुक्यातील बोधेगाव येथील केदारेश्वर साखर कारखान्याच्या परिसरात शेतवस्तीवर राहणाऱ्या पती-पत्नीस चोरट्यांनी गळ्याला चाकू व गुप्ती लावत दांड्याने मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना गुरुवारी (दि. १०) मध्यरात्री एकच्या वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय विश्वनाथ कानडे (वय ५२) हे केदारेश्वर साखर कारखान्याच्या नजीक शेतवस्तीवर पत्नी नंदाबाई यांच्यासह राहतात. त्यांना दोन मुले असून ते कामानिमित्त बाहेरगावी असतात. बुधवारी रात्री जेवण करून विजय कानडे व पत्नी घराच्या हॉलमध्ये झोपले होते. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी किचन रूमचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कोयंडा खाली पडून आवाज झाल्याने विजय कानडे यांना जाग आली. झोपेतून सावरेपर्यंत पाच चोरटे आत शिरले आणि घरातील लाइट बंद केले. दोन चोरट्यांनी विजय कानडेंच्या गळ्याला चाकू व गुप्ती लावत लाकडी दांड्याने मारहाण करून खाली गप्प बसण्यास सांगितले. त्यावेळी पत्नी नंदाबाईने त्यांना मारू नका, त्यांना कॅन्सर आहे. तुम्हाला घरातील काय लागते ते सगळे न्या, अशी गयावया करत चोरट्यांना कानातील चार ग्रॅमचे सोन्याचे दागिने काढून दिले. तोपर्यंत इतर तिघे जण घरातील साहित्याची उचकापाचक करत होते. त्यानंतर चोरट्यांनी दाम्पत्याचे मोबाइल हिसकावून घेतले व त्यांना घरात कोंडून मोबाइल अंगणात फेकून देत त्या ठिकाणाहून पलायन केले. पहाटे चारच्या दरम्यान नजीक राहणारा त्यांचा लहान भाऊ राजेंद्र कानडे यास त्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी घर उघडले.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Web Title: Ahmednagar Theft knife was attached to the neck and gold ornaments were removed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here