Home अहमदनगर शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेक; भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात...

शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेक; भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा

Ahmednagar News: (Ahmednagar Stone pelting at the hotel of Shinde faction leader) एका लग्न समारंभात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याचा सातपुते यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात कर्डिले यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना घेऊन सातपुते यांच्या मालकीच्या रंगोली हॉटेवर तुफान दगडफेक.

Ahmednagar Stone pelting at the hotel of Shinde faction leader

अहमदनगर : शिवसेनेत बंड झालं आणि एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेत भाजपशी युती केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे – भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. दरम्यान या सत्तांतरानंतर या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊ शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेकीची घटान समोर आली आहे. यामुळे तणावपूर्ण वातावरण बनले आहे. 

अहमदनगरमधील केडगाव परिसरात भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पुत्र आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सातपुते यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेली की, कर्डिले यांच्या मुलाने शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नगर तालुक्यातील एक गावात एका नेत्याकडील लग्न समारंभाला राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली होती. तेथे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार सातपुते हेही उपस्थित होते. अहमदनगरधील नेहमीच्या पद्धतीने खुन्नस देण्यावरून त्यांच्यात वाद झाला.

एका लग्न समारंभात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याचा सातपुते यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात कर्डिले यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना घेऊन सातपुते यांच्या मालकीच्या रंगोली हॉटेवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत हॉटेलसह परिसरातील काही वाहनांचे देखील नुकसान झाले.

याप्रकरणी दिलीप सातपुते यांचे बंधू विठ्ठल सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी कर्डिले यांच्या मुलासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

Web Title: Ahmednagar Stone pelting at the hotel of Shinde faction leader

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here