जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार: पोलीस अधीक्षक मनोज पाटील
अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार तसेच सर्वसामान्य नागरिकाला न्याय व दिलासा मिळेल असा विश्वास निर्माण करण्याची ग्वाही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी आपला पदभार स्वीकारला. पाटील हे सोलापूर येथून बदली होऊन अहमदनगरला आले आहे. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले नगरबाबत ऐकले आहे, मात्र येथे काम करण्याची पहिलीच वेळ आहे. त्यांनी बावीस वर्ष सेवा केलेली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, भिवंडी, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर या ठिकाणी काम केले आहे.
राज्यातील सर्वाधिक मोठा जिल्हा असल्याने काम करण्याचे आवाहन आहे. पोलीस कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबविणे, पोलिसांची कामगिरी व जबाबदारी पार पाडणे, जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार अशा गोष्टींना प्राथमिकता देणार आहे. जेथे पोलिसांच्या रिक्त जागा आहेत, त्या भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Sp Manoj Patil gives Testimony