Ahmednagar: अहमदनगर जिल्हा परिषद अधिकाऱ्याचा करोनाने मृत्यू
अहमदनगर(Ahmednagar): जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा काल करोनामुळे मृत्यू झाला आहे. या अधिकाऱ्याच्या मृत्यूने जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून या अधिकाऱ्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरु होते. जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत आहे. करोनाने संपूर्ण नगर शहराला वेढले आहे. शासकीय कार्यालयातही प्रवेश केला आहे. मागील आठवड्यात जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली होती. त्याच्यावर अतिदक्षता विभागत उपचार सुरु होते. मंगळवारी पहाटे त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याचा करोनाने मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे दिवसभर जिल्हा परिषदेचे काम बंद ठेवण्यात आले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची निधनाची बातमी समजताच कर्मचारी शोकमग्न झाले.
हे अधिकारी नगरमध्येच वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Ahmednagar Senior ZP officer death coronavirus