Home अहमदनगर शाळकरी मुलीचा सतत पाठलाग करणाऱ्या त्या आरोपीस न्यायालयाने दिला असा दणका

शाळकरी मुलीचा सतत पाठलाग करणाऱ्या त्या आरोपीस न्यायालयाने दिला असा दणका

Ahmednagar school girl gets justice

अहमदनगर | school girl gets justice: एका शाळकरी मुलीचा सातत्याने पाठलाग करणाऱ्याविरुद्ध मुलीने धाडसी तक्रार दिल्याने तसेच मुलीने व तिच्या आईने साक्ष दिली. अखेर न्यायालयाने आरोपीला २ वर्ष सक्त मजुरी आणि दंड ठोठाविला आहे. संदीप नानासाहेब निकम (वय ३४ रा. गौतमनगर,राहुरी) असे आरोपीचे नाव आहे.

राहुरी तालुक्यात २०१९ रोजी आरोपी निकम शाळकरी मुलीचा पाठालाग करीत होता. ११ एप्रिल २०१९ रोजी मुलगी आपल्या घराशेजारिच बसची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ येऊन त्याचा मोबाईल नंबर तिला देत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असे. फोन करीत जा असे सांगत. मुलीने नकार दिल्यावर वडिलांकडे खोटी तक्रार करण्याची धमकी देत. मुलीने त्याच्याशी संपर्क केला नाही त्यामुळे ३० एप्रिलला आरोपी तिच्या घरी आला. तिला फोन का केला नाहीस अशी विचारणा करत तिचा विनयभंग केला. एके दिवशी तिचा पाठलाग करत छेडही काढली.

१६ मे रोजी त्याने आणखी धाडस केले. त्या दिवशी दुपारी तो मुलीच्या घरी आला. त्यावेळी तिची आईही घरी होती. त्याला घराभोवती चकरा मारताना पाहून आईने हटकले. याचा राग येऊन त्याने मुलीच्या आईलाही शिवीगाळ केली, धमकी दिली. हा प्रकार वाढल्याने मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याच्यावर विनयभंग, धमकावणे, बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा यातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीस पोलिसांनी अटक केली. सरकार पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीत मुलगी, पिडीत मुलीची आई, पंच व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा तसेच विशेष सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा दिली.

Web Title: Ahmednagar school girl gets justice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here