Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४६ टक्के
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ५४१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. ५४१ रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते ९५.४६ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्यात एकूण ५० हजार ९१८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४६ टक्के इतके झाले आहे. सध्या १६०६ इतके रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा ११५, जामखेड २३, अकोले ३३, कर्जत २१, नगर ग्रामीण ३६, कोपरगाव २१, नेवासा २६, पारनेर ३३, पाथर्डी ३६, राहता ३२, राहुरी १५, संगमनेर ५२, शेवगाव १४, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ३१, कॅन्टोनमेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल १०, इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ८१३ रुग्ण मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ३३७ इतकी झालेली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar patient discharge rate 95