वाहनचालकाला लुटणारी प्रवासी टोळी २४ तासांत जेरबंद
अहमदनगर | Ahmednagar: नगर शहरातील माळीवाडा येथून चार चाकी वाहनात बसलेल्या पाच अनोळखी प्रवाशांनी वाहनचालकाला लुटल्याची घटना सोमवारी घडली होती. यामधील चार चोरट्यांना ३४ तासांच्या आत पकडण्यात यश आले आहे.
बाबू बाळू शिंदे वय २० रा. दहीवंडी बीड, विश्वजित सिद्धेश पवार वय २० रा. ता. शिरूर कासार, रमेश कचरू आघाव वय २० ता. शिरूर कासार, योगेश संजय आघाव वय १९ रा. ता. शिरूर कासार जि. बीड असे या दरोडेखोर आरोपींची नावे आहेत.
दत्त्तात्रय खंडू हापसे रा. टाकळीमिया ता. राहुरी या वाहनचालकाने फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी सकाळी राहुरी येथून नगरकडे घेऊन प्रवाशांना त्यांच्या चार चाकी वाहनातून घेऊन निघाले. त्यांच्या वाहनात बसलेल्या पाच अनोळखी प्रवाशांनी राहुरी तालुक्यातील नांदगाव फाटा येथून त्यांच्या डोळ्यात तिखट टाकून गळ्याला टोकदार वस्तू लावून पाठीमागील सीटच्या मध्ये दाबून धरून पुणे मार्गाने पारनेर तालुक्यातील सुपा येथे घेऊन गेले.
तेथे गळ्याला टोकदार वस्तू लावून त्यांच्याकडील एटीएम कार्ड हिसकावून घेत त्याचा पासवर्ड विचारला. तसेच चार चाकी वाहन असे मिळून ५ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले.
कोतवालीचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना हे चोरटे पुण्यातील चाकण परिसरात या वाहनाची विल्हेवाट लावण्यासाठी थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार चाकण येथे कोतवालीच्या गुन्हे शोध पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचे आणखी दोन साथीदार यातील शिरूर कासार येथून योगेश आघाव यास तेथून ताब्यात घेण्यात आले. आणखी एक साथीदार पसार झाला आहे. पोलिसांनी चोरी केलेले वाहन व मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार हे करीत आहे.
Web Title: Ahmednagar Passenger gang robbing driver arrested