अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ कॉरोंटाइन
अहमदनगर: जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे स्वतःहून कॉरोंटाइन झाले आहेत. हसन मुश्रीफ यांचे शुक्रवारपासून सोमवारपर्यंत कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते.
मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. या आठवड्यात ते कोणालाही भेटणार नाही.
मंत्री हसन मुश्रीफ यांचा समर्थक आजारी होता. त्याची विचारपूस करण्यासाठी ते त्याच्या घरी भेटण्यास गेले होते. त्यांनतर त्या समर्थकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दक्षता म्हणून जनतेस समूह संसर्ग होऊ नये म्हणून ते स्वतःच होम कॉरोंटाइन झाले आहेत.
शुक्रवार ते सोमवार या दरम्यानचा कालावधी कोल्हापूर दौरासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र आता त्यांनी शासकीय बैठका व सर्वच कार्यक्रम रद्द केली आहेत.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Ahmednagar parent minister Hasan Mushrif quarantine