अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ करोना पॉझिटिव्ह
अहमदनगर: जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट द्वारे दिली आहे.
त्यांनी नमूद केले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना, आमदारांना, सेलिब्रिटी यांना करोनाची लागण होऊन बरे झालेले आहेत. हसन मुश्रीफ यांनी कालच जिल्ह्यात करोना आढावा बैठक घेतली होती.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Parent minister Hasan Mushrif Corona positive