अहमदनगर: या साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश
Breaking News | Ahmednagar: 21 कोटी 3 लाख 50 हजारांच्या वसुलीसाठी कारखान्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त.
अहमदनगर: अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुंडलिकराव जगताप साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. उसाचे पैसे थकविल्यामुळे कारवाईचे आदेश.
शेतकऱ्यांचे गाळप उसाचे पैसे थकवल्यामुळे पुणे साखर आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत. 31 मे 2024 रोजीचे हे आदेश आहेत. 21 कोटी 3 लाख 50 हजारांच्या वसुलीसाठी कारखान्याची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सलीमठ यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
Web Title: Ahmednagar Order of confiscation of assets of sugar factory
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study