Home अहमदनगर अहमदनगर: जमिनीच्या वादातून एकाचा खून

अहमदनगर: जमिनीच्या वादातून एकाचा खून

Breaking News | Ahmednagar:  एका वृध्द इसमाला लोणी काळभोर टोल नाक्याजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीचा खून.

Ahmednagar One killed due to land dispute

राहुरी:  जमीन हडपण्यासाठी कारोना काळात करोनाची लागण झाल्याचे भासवून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका वृध्द इसमाला लोणी काळभोर टोल नाक्याजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या व्यक्तीचा खून (Murder)केला, असा आरोप मृत व्यक्तीच्या मुलाने केला आहे. याप्रकरणी मुलाने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशावरून हडपसर पोलिसांनी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचार्‍याचा समावेश आहे. हा प्रकार 26 मे 2021 ते 26 जून या कालावधीत घडला आहे.

राजेंद्र नारायण तेलोरे (वय 45, रा. खळेवाडी, मु.पो. ब्राह्मणी, ता. राहुरी) यांनी पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक सात मध्ये फौजदारी किरकोळ अर्ज दाखल केला होता. फिर्यादी सध्या कामानिमित्त नाशिक येथे राहत असून त्यांचे आई-वडिल मूळ गावी ब्राम्हणी येथे राहत होते. ते दोघेही आजारी असल्याने त्यांची देखभाल करण्यासाठी केअरटेकर म्हणून एका महिलेला कामावर ठेवले होते. गणेश पोटे हा पोलीस कर्मचारी असून फिर्यादी राजेंद्र तेलोरे यांचा भाचा आहे तर विलास तेलोरे हा सख्खा भाऊ आणि आकाश तेलोेरे हा पुतण्या आहे. हे सर्व राजेंद्र तेलोरे यांच्या आई-वडिलांना जमिनीसाठी त्रास देत होते. त्यामुळे मयत नारायण यांचे तिघांबरोबर सतत वाद होत होते.

14 मे 2021 रोजी गणेश पोटे याने केअरटेकरला न सांगता नारायण तेलोरे यांना मांजरी येथे आणले. त्यानंतर 26 मे 2021 रोजी मध्यरात्री एका हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे राजेंद्र तेलोरे यांना सांगितले. तसेच त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले. वडिलांच्या मृत्यू बाबत विचारणा केली असता फिर्यादी यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन घाईघाईने वडिलांवर अंत्यसंस्कार केले. राजेंद्र तेलोरे यांना वडिलांच्या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. डॉक्टरने पोटे यांना बोलावून घेतले.

पोटे याने फिर्यादी यांना धमकी दिली. तसेच वडिलांच्या मृत्यूबाबत गावात कोठेही बोलू नको, आमच्या नादी लागू नको. नाहीतर तुझ्या बापाच्या किडन्या जशा गायब केल्या, तशा तुझ्यापण गायब करून तुला संपवून टाकेन, अशी धमकी दिली. तसेच काठी, तलवार व गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी गणेश विलास पोटे (वय 37, रा. मांजरी ग्रीन अ‍ॅनेक्स, हडपसर), विलास नारायण तेलोरे (वय 57), आकाश विकास तेलोरे (वय 28, दोघे रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, अहमदनगर), शिवम हॉस्पिटल अशी चार जणांच्या विरोधात पोलिसांनी फौजदारी संहिता कलम 156(3) प्रमाणे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आयपीसी 302, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

Web Title: Ahmednagar One killed due to land dispute

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here