अहमदनगर जिल्ह्यात एकाच दिवशी ३५० जणांचे पॉझिटिव्ह अहवाल
अहमदनगर(Ahmednagar): तालुकास्तरावर रॅपिड अँटीजेन टेस्ट मुळे करोना चाचणीचा वेग वाढलेला आहे. या टेस्टमुळे सोमवारी एकाच दिवशी ३५० जणांचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
एकाच दिवसात्त घोषित झालेले पॉझिटिव्ह रुग्ण घोषित करण्याची पहिलीच वेळ आहे. यामुळे सोमवारी करोना बाधितांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनबाधितांचा आकडा २ हजार २७ इतका झाला आहे.
सोमवारी करोना टेस्ट प्रयोगशाळेत १० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळेत बाधित आणि पोर्टलवर १७३ जणांची नोंद समाविष्ट करण्यात आली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी जलद गतीने होत आहे. रॅपिड अँटीजेन टेस्ट ही गेल्या तीन चार दिवसांपासून होत आहे. आतापर्यंत १०९५ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात १५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सोमवारी ३५० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ८५४ इतकी आहे.
बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्याची चाचणी घेण्यात येत आहे. यासाठी तालुकास्तरावर वितरण करण्यात आले आहे. रॅपिड अँटीजेन टेस्ट कीट चे वितरण श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, संगमनेर, पाथर्डी, महानगरपालिका आरोग्य यंत्रणेला करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांचा अहवाल सोमवारी एकत्रित प्राप्त झाला.
Website Title: Ahmednagar one day 350 report corona infected