डॉक्टरकडून नर्सचा विनयभंग, तू माझ्या सोबत आली नाहीस तर कोंबडीसारखी कापून टाकेन,
अहमदनगर | Ahmednagar: रस्त्याने जात असताना एका डॉक्टरने नर्सचा हात पकडून नर्सचा हात पकडून विनयभंग व शिवीगाळ करण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला आहे. विनयभंग करणाऱ्या डॉक्टरविरोधात गुरुवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणपत भाऊसाहेब जाधव रा. नांदगाव ता. राहुरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार २२ सप्टेंबर रोजी दुपारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास सदर नर्स शहरातील प्रेमदान चौकातून जात होती. यावेळी जाधव हा मोटारसायकलवरून आला तिचा हात पकडून मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह धरला. तिने विरोध केला त्यावेळेस जाधव याने शिवीगाळ केली. तू माझ्यासोबत आली नाहीस तर तुला कोंबडीसारखे कापून टाकेन अशी धमकी दिली.
तसेच जाधव हा वेळोवेळी पाठलाग करून त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वाघमारे हे अधिक तपास करीत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Nurse molestation by doctor