महिलेस ओळख काढत रिक्षात बसविले अन झाले असे काही
अहमदनगर | Ahmednagar News: एका तोतया तलाठ्याने पैसे काढून देण्याच्या बहाणा करून ओळख काढत महिलेकडील २ हजार रुपये व सोन्याचे दागिने असा ३७ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. माळीवाडा परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली.
लुट झालेल्या महिला शांताबाई सोपान मोरे वय ६५ रा. वाळूंज ता. नगर यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तोतया तलाठी व्यक्तीवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी दुपारच्या सुमारास शांताबाई मोरे या त्यांच्या बहिणीला रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी माळीवाडा बस स्थानकावर बसची वाट पाहत उभ्या असताना त्यावेळी तेथे एक अनोळखी व्यक्ती आला व तो शांताबाई यांना म्हणाला, मी तुम्हाला ओळखतो, मी वाळुंज गावचा तलाठी आहे. तुमचे बँकेमध्ये पिकविम्याचे सात हजार रूपये आले आहे. ते काढून देतो, असे म्हणत त्याने शांताबाई यांचा विश्वास संपादन करत त्यांना रिक्षामध्ये बसविले. रिक्षा पुणे बस स्थानकाच्या मागे घेऊन जात शांताबाई यांच्याकडील दोन हजार रूपयांची रक्कम व सोन्याचे दागिणे असा 37 हजारांचा ऐवज लुटला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार हे करीत आहे.
Web Title: Ahmednagar news woman was identified and put in a rickshaw