Home अहमदनगर अहमदनगरमधील सैन्यभरती लांबणीवर, हे आहे कारण

अहमदनगरमधील सैन्यभरती लांबणीवर, हे आहे कारण

Ahmednagar News today recruitment rally scheduled postponed

अहमदनगर | Ahmednagar News Today: राज्यातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती होऊन देशसेवा कार्य करण्याचे स्वप्न पाहत आहे. भरती होण्यासाठी तरुण सातत्याने प्रयत्न करीत आहे. इंडियन आर्मीच्या वतीने देशात विविध ठिकाणी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात होणारी सैन्य भरती लांबणीवर टाकण्यात आली आहे.

ही भरती सोल्जर जनरल ड्युटी, नर्सिगं असिस्टंट आणि सोल्जर क्लार्क, सोल्जर ट्रेडसमन आणि सोल्जर टेक्निकल या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असं इंडियन आर्मीच्या पुणे येथील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

इंडियन आर्मीच्या वतीनं अहमदनगरमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबंर दरम्यान सैन्य भरती घेण्यात येणार होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती पुणे येथील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितलं आहे.

ANI Tweet: Maharashtra | Ahmednagar recruitment rally scheduled 7th to 23 Sep at Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri in Ahmednagar district postponed due to ongoing COVID-19 pandemic: PRO (Defence), Pune

Web Title: Ahmednagar News today recruitment rally scheduled postponed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here