Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात अवघ्या इतक्या टक्के लोकांनी लसीचे घेतले दोन्ही डोस

अहमदनगर जिल्ह्यात अवघ्या इतक्या टक्के लोकांनी लसीचे घेतले दोन्ही डोस

Ahmednagar News small percentage of people took both doses of the vaccine

अहमदनगर | Ahmednagar News: केंद्रसरकार कडून पुरवली जाणारी अपुरी लस, लसीकरणात येणाऱ्या अडचणी त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत 24 टक्के लोकांनी पहिला तर 9  टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 12 लाख 95 हजार डोस वापरले गेले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास कोरोनाचे 100 टक्के लसीकरण कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु झाले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचार्‍यांचे लसीकरण केले गेले. सध्या जिल्ह्यात 38 लाख 87 हजार 545 नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 9 लाख 35 हजार 132 नागरिकांना पहिला डोस, तर 3 लाख 60 हजार 204 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे एकूण आतापर्यंत 12 लाख 95 हजार 336 डोस संपले आहेत. सध्या दररोज सहा ते दहा हजार लोकांचे लसीकरण होत आहे. सद्यस्थिती १८ वर्षापुढील लसीकरण सुरु असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी आढळून येत आहे.

Web Title: Ahmednagar News small percentage of people took both doses of the vaccination

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here