Home अहमदनगर वाळू तस्करांनी तलाठी व कोतवाल यांना मारहाण करून वाळूचा ट्रक पळविला

वाळू तस्करांनी तलाठी व कोतवाल यांना मारहाण करून वाळूचा ट्रक पळविला

Ahmednagar News Sand smugglers beat up Talathi and Kotwal 

नेवासा | Ahmednagar News: वाळू व्यवसायाची दहशत गुंडगिरीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काल पहाटेच्या सुमारास खपटीचे तलाठी गणेश अप्पासाहेब घुमरे व कोतवाल बाळासाहेब सुखदेव चौधरी यांना मंगळवारी पहाटे वाळू तस्करांनी धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच वाळूचा ट्रक पळवून नेला. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हंटले आहे की, तहसीलदार रुपेश सुराणा यांनी अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले. हे दोघे रात्रीचे फिरत असताना पहाटे ५ वाजेच्या सुमारास गणेश शिंदे यांच्या वस्तीजवळ समोरून नेवासेकडून एक आयशर विटकरी रंगाचा टेम्पो येताना दिसला. त्यास थांबविले असता त्या टेम्पोमध्ये पाठीमागे दोन ब्रास वाळू असल्याचे दिसून आल्याने त्या टेम्पोवरील चालकास फिर्यादी कर्मचाऱ्यांनी ओळख सांगून त्यास त्यांचे नाव  गाव व वाळू वाहतूक परवानाबाबत विचारले असता त्याने नाव न सांगता टेम्पोचे पाठीमागे जाऊन कोणाल तरी फोन लावून तेथून पळून गेला. या टेम्पोचा नंबर पाहिला असता त्या टेम्पोला कोठेही नंबर प्लेट आढळून आली नाही.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो, हसण्यासाठी जन्म आपला 

त्यानंतर टेम्पोचे पाठीमागून एक स्विफ्ट कार आली. त्यातील दत्तात्रय हिवरे व अनोळखी दोन इसमांनी तलाठी व कोतवाल यांना शिवीगाळ केली. धक्काबुक्की करत तुमचे आम्ही हात पाय मोडून टाकू अशी धमकी दिली. दरम्यान पळून गेलेला टेम्पो चालकाने टेम्पो चिंचबन रोडने घेऊन पळून गेला. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक समाधान भाटेवाल हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Sand smugglers beat up Talathi and Kotwal 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here