अहमदनगर शहरात घोडयावर बसून पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध
अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर शहरातून कॉंग्रेसने पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढ निषेधार्थ घोडयावर बसून मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
केंद्रसरकारने सातत्याने पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढ केली आहे. अगोदरच कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाऊनमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. रोजगार नाही. त्यामध्ये महागाईचा भडका यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे.
केंद्रसरकारने नागरिकांना दिलासा देण्याऐवजी इंधन दरवाढ करून आगीत भस्मसात करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्वसामान्यांना जगणे अधिकच कठीण झाले आहे. यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष किरण काळे यांनी शहरातून मोर्चा काढला आहे. घोड्यावर बसून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दरवाढ मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. या मोर्चाने शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Web Title: Ahmednagar News Protest against petrol and diesel price hike on horseback