अकोलेतील घटना: पोलिसानेच केली फिर्यादी महिलेकडे शरीरसुखाची मागणी
अकोले | Ahmednagar News: पोलीस कॉन्स्टेबलने महिला तक्रारदाराकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. पिडीत महिलेने हा प्रकार समोर आणला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सदर पोलीस विरोधात कारवाई करण्यसाठी तक्रार केली आहे. संबंधित पोलीस खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी धमकी देतो. त्याला तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार मी विधवा आहे. दीर व माझ्यात जमिनीचे वाद सुरु आहेत. घरगुती त्रासाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसाने माझ्याशी ओळख वाढवून मी एकटी राहत असल्याचा गैरफायदा घेऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन सुरु केले. तो सातत्याने शरीरसुखाची मागणी करीत आहे. या पोलिसाने माझी बदनामी सुरु केली असून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या पोलिसाने माझे व मुलांचे जगणे अवघड केले असून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Web Title: Ahmednagar News police demanded the body of the complainant