धक्कादायक: शिर्डी साई संस्थानच्या अधिकाऱ्याने महिला भक्तास पाठविले अश्लील मेसेज
शिर्डी | Ahmednagar News: शिर्डी साई संस्थानमधून एक धककादायक वृत्त उघडकीस आले आहे. साई संस्थानच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने काही महिला साई भक्तांना मेसेजमध्ये अश्लील माहिती पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी मुंबई येथील काही पिडीत महिलांनी तक्रार दिली असल्याची माहिती आली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी या महिलांनी शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायात यांच्याकडे करण्यात आली आहे. राहता तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी भाग्यश्री बानावत यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज
या निवेदनात उल्लेख केला आहे की, संस्थानच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने साई भक्त महिलांशी जवळीक साधली. त्याने महिलांना मोबाईलवर अश्लील व्हिडियो असलेले मेसेज पाठविले. या महिलांनी शिर्डीच्या साईबाबा संस्थांकडे तक्रार केली आहे. या महिलांची तक्रारीची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
Web Title: Ahmednagar News official of Shirdi Sai Sansthan sent an obscene message to a female devotee