Home अहमदनगर जिल्ह्यातील या चार पोलीस निरीक्षकाच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

जिल्ह्यातील या चार पोलीस निरीक्षकाच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

Ahmednagar News four police inspectors transferred

अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर झाल्या आहेत तर बाहेरून त्यांच्या जागी नवीन चार पोलीस निरीक्षक जिल्ह्यात बदलून आहेत. तर तीन पोलीस निरीक्षकांना मुदतवाढ मिळाली आहे. नाशिक परिक्षेत्र स्तरावरील पोलीस निरीक्षक यांच्या बदल्याबाबत आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक अश्वती दोर्जे  यांनी मंगळवारी रात्री काढला आहे.

नाशिक ग्रामीण येथे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, दौलत जाधव, वसंत पथवे यांची बदली झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांची बदली झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार व अभय परमार यांना मुदतवाढ मिळाली आहे.

बदली झालेल्या चार निरीक्षकांच्या जागी जळगाव जिल्ह्यातून भिमराव नंदुरकर, नंदुरबार जिल्ह्यातून विजयसिंग राजपुत, नाशिक ग्रामीणमधून नरेंद्र भदाणे व गुलाबराव पाटील यांची जिल्ह्यात बदली झाली आहे.

Web Title: Ahmednagar News four police inspectors transferred

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here