सरकारी नोकरीसाठी खोटे प्रतिज्ञापत्र, एकावर गुन्हा दाखल
अहमदनगर | Ahmednagar News: सैन्यदलात भरती होण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने भिंगार पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीणकुमार एस (वय २१ रा. कुकुलम ता. तेरूमंगलम जि. मदुराई, तामिळनाडू) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे .
भिंगार येथील आर्मड रेजिमेंटचे अधिकारी एल. भुपेंदर सिंग (वय 41) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी बुधवारी दाखल झाला आहे. २३ डिसेंबर २०१९ ते ४ जून २०२१ या दरम्यान ही घटना घडली आहे. प्रवीण कुमार याच्याविरोधात तामिळनाडूतील शोलावंदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. माहिती लपवून प्रवीण कुमार याने आर्मड रेजिमेंट येथील सैन्यदलामध्ये भरती होण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. याप्रकरणी प्रवीण कुमार विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल दहीफळे हे करीत आहे.
Website Title: Ahmednagar News False affidavit for government job