अल्पवयीन मुलीचे फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करत बदनामी
श्रीगोंदे | Ahmednagar News: श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो काढून सोशियल मेडीयावर व्हायरल केले तसेच घरी कोणी नाल्याचे पाहून घारगाव येथील तरुणाने पिडीत मुलीचा हात पकडून छेडछाड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारगाव सुद्रिक येथे घारगाव येथील सोन्याबापू बाळासाहेब चौरे याचा लिंबाचा काटा आहे. काट्यावर घेतलेल्या लिंबाचे पैसे देण्याचे बहाण्याने पिडीत मुलीशी ओळख वाढवून त्याच्या मोबाइलमध्ये दोघांचे फोटो काढले. आपण पळून जाऊन लग्न करू असे बोलताच पिडीत मुलीने त्यास नकार दिला. त्याने आपले दोघांचे फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सोन्याबापू चौरे याने दिनांक २५ जुलै रोजी दोघांचे फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करत मुलीची बदनामी केली. त्यांनतर २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुलीच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आरोपी चौरे याने मुलीची छेड काढली.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून सोन्याबापू बाळासाहेब चौरे याच्यावर श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar News Defamation of a minor girl’s photo going viral on social media