Home अहमदनगर कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय

Ahmednagar News decision of Zilla Parishad for women widowed due to corona

अहमदनगर | Ahmednagar News: कोरोनामुळे पतीचा मृत्यू झालेल्या महिलांच्या पुनवर्सनासाठी अहमदनगरच्या जिल्हा परिषदेने काही योजना आखल्या आहेत. अंगणवाडी सेविका भरतीसह सरकारच्या विविध योजनांचा लाभ देताना या महिलांना प्राधान्य देण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने ठरवलं आहे.

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झालेल्या महिलांची संख्या मोठी आहे. त्यांना मदत करण्यासाठी करोना एकल महिला पुनर्वसन समितीमार्फत विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात येत आहे.  

बाल संगोपन योजनेत जिल्ह्यातील प्रत्येक गरजू मुलाचा समावेश करण्यात येईल. अंगणवाडी भरतीसह विविध योजनांमध्ये या महिलांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. या महिलांचा त्यांच्या गावातील बचत गटांमध्ये समावेश करण्यात येऊन रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार योजनेबाबत बाजाराच्या गावी कॅम्प घेण्यासही अधिकार्‍यांनी सकारात्मकता दर्शविली. या महिलांना सरकारने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडणार असून जिल्हा परिषद या महिलांसाठी प्रायोगिक स्वरूपाचे पथदर्शक काम करेल. असापॅटर्न महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाकचौरे यांनी व्यक्त केला.

Web Title: Ahmednagar News decision of Zilla Parishad for women widowed due to corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here