अहमदनगर जिल्ह्यात कोरोना वाढ सुरूच, संगमनेर सर्वाधिक
अहमदनगर | Ahmednagar News Corona Update today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढीस सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत ८६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर व पारनेर तालुक्यात अधिक रुग्ण मिळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १७१ रुग्ण आढळून आले आहे. संगमनेरकरांची चिंता दूर होताना दिसून येत नाही. दिवसेंदिवस रुग्णांत वाढ सुरूच आहे.
गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: १७१
पारनेर: १२७
श्रीगोंदा: ८६
अकोले: ८५
पाथर्डी: ५६
राहता: ४८
नगर ग्रामीण: ४६
शेवगाव: ४२
कर्जत: ३६
मनपा: ३३
नेवासा: ३१
कोपरगाव: २८
श्रीरामपूर:२४
जामखेड: २३
राहुरी: २१
भिंगार: ३
इतर जिल्हा: ३
इतर राज्य: १
मिलिटरी हॉस्पिटल: ०
असे एकूण जिल्ह्यात ८६४ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona Update today 864