अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, वाचा तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या
अहमदनगर | Ahmednagar News Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसख्या किंचित वाढली आहे. दररोज पाचशेच्या आत असणारी रुग्णसंख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत ६७९ रुग्णसंख्या जिल्ह्यात वाढली आहे. नगर शहरात पुन्हा रुग्णवाढ झाली आहे. पारनेर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
नगर शहरात सर्वाधिक १४९ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
मनपा: १४९
पारनेर: १०२
नगर ग्रामीण: ६४
पाथर्डी: ४९
राहुरी: ४७
शेवगाव: ४७
संगमनेर: ३५
राहता: ३३
श्रीगोंदा: ३२
इतर जिल्हा: २६
नेवासा: २१
कर्जत: १९
श्रीरामपूर: १९
अकोले: १६
जामखेड: ९
कोपरगाव: ७
भिंगार:४
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण ६७९ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona Update 679