वराचे मित्र चांगले नाहीत म्हणून नवरीने मोडलं लग्न
अहमदनगर | Ahmednagar News: जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील एका वरासाठी आपले मित्रच ठरले विघ्नहारी. काष्टी येथील एका अलिशान हॉटेलात पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडल्यानंतर एका अजब कारणाने लग्नास नकार दिला आहे. श्रीगोंद्यातील नवरदेवाला रिकाम्या हाती परत यावे लागले. लग्न मोडण्याचे कारण ऐकून पाहुणे हैराण झाले. साखरपुडा झाला, हळदीची तयारी सुरु होती तेवढ्यात नवरीने लग्नाला नकार दिल्याने विवाहस्थळी एकच गोंधळ उडाला.
काष्टी येथील एका आलिशान हॉटेलमध्ये लग्नाचा बॅंडबाजा वाजत असताना. दोन्ही बाजूंचे नातेवाईक आनंदानं दोघांच्या लग्नाला उपस्थित होते. साखरपुडा आवरल्यानंतर हळदी समारंभाची तयारी सुरू असताना, वराचे मित्र चांगले नाहीत, असं कारण सांगून नवऱ्या मुलीनं चक्क लग्नाला नकार दिला. त्यामुळे श्रीगोंदा येथील रहिवासी असणारा नवरदेव रिकाम्या हाती परतला आहे. नवरदेवासाठी त्याचे मित्रच लग्नातील विघ्न ठरले आहेत.
खरंतर, वधू-वरांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनं काष्टी याठिकाणी एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Web Title: Ahmednagar news bride has to look her best during this time